Thursday, July 10, 2025

केंद्राने थकबाकी दिल्यास ५ वर्षांसाठी पेट्रोल-डिझेलच्या करात सूट देणार

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी आभासी संवाद साधताना "राष्ट्रीय हितासाठी" व्हॅट कमी करण्याचे आवाहन राज्यांना केले. त्यांचे विधान एकांगी असून लोकांना संभ्रमात टाकणारे आहे. त्यांनी बैठकीत सांगितलेले तथ्य खोटे आहेत, असा पलटवार ममता यांनी मोदींवर केला.


गेल्या तीन वर्षांपासून आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर सबसिडी देत आहोत. यासाठी आम्ही एकूण १५०० कोटी रुपये खर्च केले आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.


ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “पंतप्रधान मोदी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात करण्याचे आवाहन करत आहेत. पण केंद्र सरकारकडे आमची ९७ हजार कोटींची थकबाकी आहे. केंद्राने यातील अर्धी रक्कम जरी दिली, तरी आम्ही कर कमी करू. नागरिकांच्या हिताचा विचार करून त्यांना त्वरित ३ हजार कोटींची सबसिडी देऊ. सबसिडी देण्यासाठी मला काहीही अडचण नाही. पण केंद्राकडे थकबाकी असल्याने राज्य सरकार कसे चालवायचे?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

Comments
Add Comment