Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीधुळ्यात सापडल्या ८९ तलवारी

धुळ्यात सापडल्या ८९ तलवारी

सोनगीर पोलिसांनी वाघाडी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी संशयास्पद कार घेतली ताब्यात

धुळे : राजस्थानातील चितोडगड येथून जालना येथे शस्त्रास्त्रे नेणाऱ्या चौघांना मुंबई आग्रा महामार्गावर गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांनी बुधवारी सकाळी ७ वाजता पाठलाग करून पकडले. त्यांच्या वाहनातून तब्बल ८९ तलवारी आणि एक खंजीर जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जालना येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्याने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट तर सुरू नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सोनगीर पोलिसांना वाघाडी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी संशयास्पद कार नजरेस पडली. पोलिसांनी कारसह सुमारे ७ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहम्मद शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतिफ, सय्यद रहिम आणि कपिल विष्णू दाभाडे या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १८४, २३९, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -