Monday, June 30, 2025

आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होते

आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होते

मुंबई (प्रतिनिधी) : विक्रमी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामात सलग ८ सामन्यांत पराभव झाला आहे. आयपीएल २०२२ मधून बाहेर पडणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


रोहित म्हणाला की, या स्पर्धेत आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होते. अनेक दिग्गज अशा टप्प्यातून जातात. मला हा संघ आणि येथील वातावरण आवडते. त्याचबरोबर शुभचिंतकांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी आतापर्यंत संघावर विश्वास आणि निष्ठा दाखवली.


रोहितच्या मते, संघाने सर्वोत्तम प्रयत्न केला नाही. पण कधी कधी असे होते. सलग आठ पराभवानंतर रोहितने एक भावनिक ट्वीट केले आहे. त्यात तो म्हणतो, या स्पर्धेत आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होते. अनेक दिग्गज अशा टप्प्यातून जातात.


मला हा संघ आणि येथील वातावरण आवडते. त्याचबरोबर मी शुभचिंतकांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आतापर्यंत संघावर विश्वास आणि निष्ठा दाखवली. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांची कामगिरी यंदाच्या हंगामात खराब झाली आहे.

Comments
Add Comment