मुंबई (वृत्तसंस्था) : सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नईचा ११ धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज ऋषी धवनने गोलंदाजीसह चेहऱ्यावर लावलेल्या फेस शिल्डने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. काळजी म्हणून आयपीएलमध्ये खेळताना ऋषी धवन फेस शिल्ड लावून गोलंदाजी केली.
एका रणजी सामन्यावेळी गोलंदाजी करताना फलंदाजाने मारलेला चेंडू थेट ऋषी धवनच्या चेहऱ्यावर येऊन लागला होता. त्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून ऋषी धवनने सोमवारच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात फेस शिल्ड लावले होते.
रणजी चषकात गोलंदाजी करताना झालेल्या दुखापतीमुळे ऋषी धवन पंजाबसाठी सुरुवातीच्या चार सामन्यांना उपलब्ध नव्हता. रणजी चषकादरम्यान चेंडू लागल्यामुळे त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणखी दुखापत होऊ नये, म्हणून सोमवारी ऋषी धवन फेस शिल्ड घालून गोलंदाजी करत होता.