मुंबई (प्रतिनिधी) : ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदीर येथे झाले. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुस्तकाचे मूळ लेखक अनिर्बान गांगुली, शिवानंद द्विवेदी हे असून डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर, प्राची जांभेकर यांनी मराठी अनुवाद केला आहे.
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, अतुल भातखळकर, उदय निरगुडकर, ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे, अनिर्बान गांगुली, शिवानंद द्विवेदी, डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या पुस्तकातून मा. अमित शाह यांचा संपूर्ण जीवनपट साकारण्यात आला आहे. भाजपची वाटचाल आणि त्यात अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा त्यात आला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा, सोपे करून सांगण्याचे काम लेखकांनी केले आहे. अमित शाह यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी अतिशय बारकाईने त्या राज्याचा अभ्यास केला. सर्व निवडणुका लढण्याचा त्यांचा निर्णय हा उत्तर प्रदेशातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला.
८० पैकी ७३ जागा जिंकण्याचा विक्रम त्यातून साकारला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अतिशय सखोल अभ्यास अमित शाह यांनी केला आहे. अनेक तास ते यावर बोलू शकतात. त्यावर एक पुस्तक त्यांनी लिहिले आहे. देश-विदेशातून त्यासाठी त्यांनी संदर्भ गोळा केले. या पुस्तकाचे प्रकाशन अजून
व्हायचे आहे.