Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेस्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती कामांची मनपा आयुक्तांकडून पाहणी

स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती कामांची मनपा आयुक्तांकडून पाहणी

रस्त्यांवरील डेब्रिज तत्काळ हटविण्याचे आदेश

ठाणे (प्रतिनिधी) : शहरातील वर्तकनगर प्रभाग समितीमधील विविध ठिकाणच्या स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती, गटर्स कामांची आज महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी परिसर स्वच्छतेसोबत रंगरंगोटी, उद्यानाची डागडुजी व रस्त्यांवरील डेब्रिज तत्काळ हटविण्याचे आदेश डॉ. शर्मा यांनी संबंधितांना दिले. डॉ. शर्मा यांनी आज वर्तकनगर प्रभाग समिती येथून स्वच्छता कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली.

या पाहणी दौऱ्यास माजी नगरसेविका विमल भोईर, राधिका फाटक, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मारुती खोडके, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सी. डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र इमारतीची रंगरंगोटी करणे, ओपन जीम, उद्यान विकास तसेच बेंचेस व विद्युत व्यवस्था करणे, भीमनगर रस्त्यामधील दुभाजकांमध्ये झाडे लावणे, ग्रील पेंटिंग, रामदास गजानन उद्यान १५ मे, २०२२ रोजी नागरिकांसाठी खुले करणे, विनायक उद्यानात थिम पेंटिंग करणे, खेळणी दुरुस्ती करणे व रबर फ्लोरींग बसविणे, जुन्या म्हाडा इमारतींजवळील रॅबिट व कचरा उचलणे तसेच इमारत क्र. ५५, ५६ व ५७ या पुनर्वसन इमारतीचे कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधितांना दिले.

तसेच या परिसरातील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, ब्राम्हण विद्यालयातील धोकादायक झाडे तसेच पडलेल्या भिंतीचे रॅबिट उचलणे, आनंदीबाई हॉस्पिटलच्या धोकादायक इमारतीचा भार कमी करणे, शाळा क्र. ४४ मध्ये किरकोळ दुरुस्ती करून ड्रेनेज व गळतीची कामे वेळेत करून घेणे, यासोबतच टीएमटी बस चालकांकरिता विश्रांती कक्ष खासजगी विकासकांच्या माध्यमातून बनविणे, चिरागनगर नाला कलव्हर्ट रुंदीकरणाचे काम टप्प्या-टप्प्यांत पूर्ण करून घेणे, टीसीएस वॉल कंपाऊंडची रंगरंगोटी करणे, विवियाना मॉलमागील रस्त्याचे पुनर्पुष्टीकरण करणे, पाण्याचा वॉल बंदिस्त करणे आणि रस्त्याच्या कडेला पडलेला मोठा दगड उचलणे, पोखरण रोड नं .२ व्होल्टास कंपनीसमोर दुभाजक व विद्युत पोलचे कामकाज करणे, व्होल्टास कंपनीसमोरील ब्रिजच्या कडेला रॅबिट व बेवारस रिक्षा तत्काळ हटविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी साईनाथ नगर, भीमनगर परिसरातील बीएमसी पाइपलाइनलगतचा खचलेला भाग पुनर्पुष्टीकरण करण्यासाठी बीएमसीसोबत सनियंत्रण करणे, भीमनगर येथील व जानका देवी पाइपलाइनसमोरील धोकादायक शौचालय त्वरीत निष्कासित करून नवीन बांधकाम करणे तसेच या परिसरातील सार्वजनिक मोकळ्या मैदानात साफसफाई करण्याचे निर्देशही संबधितांना दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -