मुंबई : राणा पती-पत्नीला खार पोलिस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या भाजपच्या किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. यावेळी दुखापत झाली असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. यावेळी पोलिस आयुक्त संजय पांडेंवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. संजय पांडे यांनी माझी खोटी सही करून घेतली आहे. ते फोर्जरी असून माझ्या नावाने फेक एफआयआर दाखर करुन घेतला आहे. ठाकरे सरकारने खालच्या पातळीला जाऊन राजकारण केले असल्याने हे सर्व पुरावे राज्यपालांना देणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.
या पुराव्यांसहित राज्यपाल कोश्यारींना भेटणार असून तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, संजय पांडे त्यांच्या खाजगी जीवनात काही करु देत, मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही, परंतु जर ते मातोश्रीचे पोलिस आयुक्त म्हणून माफियागिरी करणार असतील तर संजय पांडेला सोडणार नाही, असा इशार त्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे परिवाराला सोडलं नाही तर संजय पांडे किस खेत की मुली है, असंही ते म्हणाले.