मुंबई : राणा दाम्पत्याला भेटायला गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले.
सोमय्यांना जखम झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी त्याच ठिकाणी गाडीत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या हनुवटी जवळून रक्त येत होते. या जखमेची मोठी चर्चाही झाली. अखेर या जखमेबाबत रुग्णालयाचा अहवाल आला आहे. यात सदर जखम ही ०.१ सेमी म्हणजेच खरचटल्यापेक्षाही छोटी असल्याचे म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांची तपासणी केल्यानंतर भाभा हॉस्पिटलने मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला आहे. त्यांच्यावर जमावाने खार पोलीस ठाणे परिसरात हल्ला केला होता. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी सोमय्यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानुसार सोमय्यांची भाभा हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली होती.