कल्याण : कसारा रेल्वे मार्गावरील वासिंद आणि आसनगांव रेल्वेस्थानका दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाले आहे.
कसारा दिशेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान अर्धा ते एक तास लागण्याची शक्यता आहे.
यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.