मुंबई (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लीग २०२२चा थरार सुरूच आहे. दरम्यान, हरभजन सिंगने टी-ट्वेंटीमधील ऑलटाइम प्लेइंग ११ ची निवड केली आहे. हरभजनच्या संघात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्या संघातील १० खेळाडूंचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे. यातील फक्त जसप्रीत बुमरा ३० वर्षांपेक्षा कमी आहे. टर्बिनेटरने त्याच्या संघात ५ भारतीय आणि ३ कॅरेबियन खेळाडूंची निवड केली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
वृत्तसंस्थेवर आपला संघ निवडताना हरभजन सिंगने चाहत्यांना आव्हान दिले आणि सांगितले की, त्याने निवडलेला संघ कोणालाही हरवू शकतो. कॅरेबियन स्टार ख्रिस गेल आणि हरभजनने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून निवड केली आहे.
भज्जीने निवडलेल्या संघात मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाला स्थान दिले नाही. त्याशिवाय गौतम गंभीर, डेव्हिड वॉर्नर आणि केएल राहुल या दिग्गज खेळाडूंनाही वगळले आहे. मात्र भज्जीने आपल्या संघाचा कर्णधार आणि यष्टिरक्षक म्हणून एमएस धोनीची निवड केली आहे. भज्जीने आपल्या संघात पाच भारतीय खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, एम.एस. धोनी, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही भज्जीने आपल्या संघात निवड केली आहे.
हरभजन सिंहचा ऑलटाइम आयपीएल संघ –
ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, शेन वॉटसन, एबी डिविलियर्स, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कायरन पोलार्ड, सुनील नारायण, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमरा.