Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीपालकमंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

पाचही कलम अजामीनपात्र, काही कलमांमध्ये ७ वर्ष शिक्षा

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनंतर राज्यमंत्री तसेच अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी हे गुन्हा दाखल केला आहे. कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून काही कलम अजामीनपात्र असल्याने बच्चू कडूंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्यावर अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत १ कोटी ९५ लाखांच्या आर्थिक अपहाराचा आरोप केला होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिल्याचा गंभीर आरोप वंचितने केला होता. वंचितच्या पाठपुराव्यानंतर बच्चू कडूंवर आर्थिक अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वंचितने यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयाने या प्रकरणात अपहार झाल्याचे प्राथमिक मत नोंदवत गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले होते.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामे पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामे नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितने केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचे वंचितने म्हटले होते. यात रस्त्यांचे ‘ग्रामीण मार्ग क्रमांक’ नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितने केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह २५ कामांना स्थगिती दिली होती.

सर्वच कलम अजामीनपात्र, काही कलमात ७ वर्ष शिक्षा

१) ४०५- सरकारी पैशांची अपव्याची व्याख्या, ३ वर्ष शिक्षा

२) ४०९,- सरकारी पैशांचा अपव्यय, १० वर्ष, जन्मठेप

३) ४२०,- फसवणूक, ७ वर्ष शिक्षा

४) ४६८, – पुराव्याशी छेडछाड करणे

५) ४७१,- खोटं कागदपत्र खरे दाखवणे, ३ वर्ष शिक्षा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -