वाडा (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व वाडा शहर शाखेच्या वतीने सोमवारी (दि. २५) पोलीस ठाणे, वाडा नगरपंचायत, तसेच वाडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील फक्त शेतकऱ्यांनाच शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, भिवंडी-वाडा, वाडा-मनोर महामार्गालगत उभ्या राहणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या आहेत. तसेच वाडा शहरातील गणेश मैदान येथे ३ मे रोजी ‘महाआरती’चे आयोजन केले असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा मोरे, तालुका संघटक संतोष भोमटे, तालुका सहसचिव सतीश पाटील, शहर अध्यक्ष जितेश किणी, विभाग अध्यक्ष स्वप्नील मोरे, शहर उपाध्यक्ष जयेश डेंगाने, मनविसे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, शहर संघटक मधुर म्हात्रे, शहर सचिव विपुल आंबेकर, विभाग अध्यक्ष प्रशांत पाटील, शहर उपाध्यक्ष मंगला निकम, करण यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.