Monday, December 2, 2024
Homeमहाराष्ट्रआरटीई: राज्यात ५१.८२ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित

आरटीई: राज्यात ५१.८२ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित

पुणे (हिं. स.) : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील सोडतीत (लॉटरी) निवड झालेल्या बालकांपैकी आत्तापर्यंत राज्यात ५१.८२ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यात प्रवेशासाठी निवड झालेल्यांपैकी ५१.४९ टक्के बालकांचे प्रवेश आत्तापर्यंत निश्चित झाले आहेत. निवड झालेल्या बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २९) मुदत आहे. आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येते.

या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेतील सोडत यापूर्वी जाहीर झाली आहे. राज्यातील नऊ हजार ८६ शाळांमधील एकूण एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी एकूण दोन लाख ८२ हजार ७८३ अर्ज आले होते. त्यापैकी सोडतीत राज्यातून ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.

त्यातील ४६ हजार ९९५ विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमधील १५ हजार १२६ जागांसाठी ६२ हजार ९६० अर्ज आले होती. त्यातील १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी सोडतीत निवड झाली असून त्यातील सात हजार ७०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -