Sunday, June 22, 2025

नवनीत राणा यांना कोठडीत हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही - गृहमंत्री

नवनीत राणा यांना कोठडीत हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही - गृहमंत्री

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी कोठडीत हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राणांच्या आरोपांसंदर्भात स्वत: चौकशी केल्याचे सांगितले. तसेच, त्या आरोप करत आहेत, तसे काहीच घडले नसून त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.


राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती माहिती लवरकच पाठवण्यात येईल", असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment