Tuesday, July 16, 2024
Homeकोकणरायगडमुरूडचा पारा तिसऱ्या दिवशीही चढाच

मुरूडचा पारा तिसऱ्या दिवशीही चढाच

तापमान पोचले ३९.४ अंशांवर

मुरूडला क्लायमेट लॉकडाऊन

मुरूड (वार्ताहर) : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २० ते २५ एप्रिलपर्यंत हवामान ढगाळ राहील व उष्णता वाढेल, या अंदाजानुसार मुरुडकरांना उष्णतेच्या लाटेचा अनुभव आला. याच महिन्यात दुसऱ्या उष्णतेच्या लाटेचा अनुभव मुरुडकरांना आला. आज तिसऱ्या दिवशी दुपारी १ च्या सुमारास मुरुडचा पारा ३८.४ अंशांवर गेला. त्यामुळे मुरुडकरांनी घरातच बसणे पसंत केल्याने मुरुडमध्ये ‘क्लायमेट लॉकडाऊन’ पाहावयास मिळाला. याच महिन्यात उष्णतेची लाट आली होती. त्यावेळी मुरुडचा पारा ४० अशांवर गेला होता.

मुरुडमध्ये आदल्या दिवशी २४ एप्रिल रोजी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुरुडमधील तापमान काही अंशांनी कमी झालेले पाहावयास मिळाले. दुसऱ्या दिवशी २५ एप्रिल रोजी वातावरण स्वच्छ होऊन कडक सूर्यप्रकाश पडून वातावरण तापायला सुरुवात झाली. दुपारपर्यंत मुरुड चांगलेच तापले होते.

त्यामुळे मुरुडच्या नागरिकांनी घरातच बसून राहणे पसंत केले. काही महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे मुरुड शहरात लॉकडाऊन पुन्हा सुरू झाले की काय असे वाटू लागले. दुपारच्या सुमारास मुरुड बाजारपेठ शांत असल्याचा अनुभव आला. मुरूड समुद्रकिनारी शुकशुकाट झालेले दिसत होते. संपूर्ण शहरात तुरळक वर्दळ पाहायला मिळत होती. या उष्णतेमुळे शहरी जनजीवन विस्कळीत झाले होते.

काही अंशी दिलासा

मुरूड शहर हे नारळी, पोफळीच्या बागेत वसलेले असल्यामुळे शहाराचे तापमान बाहेरील तापमानाच्या १ ते २ अंशाने कमी असते. त्यामुळे मुरुड शहरातील नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -