मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे असे सांगितले. याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात गेले होते. ‘त्या एफआयआरवर मी स्वाक्षरी केलेली नाही. त्या एफआयआरवरील स्वाक्षरी बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे’, असेही सोमय्या म्हणाले.
यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दाखल करण्यात आलेली एफआयआर चुकीची असून त्यावर माझी स्वाक्षरी नाही, पोलीस आयुक्तांनी माझी खोटी स्वाक्षरी केली का असा प्रश्न सोमय्या यांनी यावेळी विचारला आहे. माझ्या नावाने बोगस एफआयआर दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.