Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरखरीवलीच्या क्रशरविरोधात नागरिकांची तक्रार

खरीवलीच्या क्रशरविरोधात नागरिकांची तक्रार

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील मौजे खरिवली येथील एका खासगी कंपनीच्या जागेमध्ये इतर तीन कंपन्यांचे क्रशर मशीन चालू आहेत. या क्रशर मशीनसाठी लागणारा दगड ३५ सेक्शन व खासगी वन संपादित असलेल्या जागेमधून काढण्याचे काम दिवस-रात्र चालू आहे. तर सदरच्या जमिनीमध्ये वनेतर कामास बंदी असल्यामुळे २५ ते ३० वर्षांपूर्वी सागवान वृक्षांची लागवड केलेली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सलोनी सदर खासगी कंपनीने वन विभागाच्या कोणत्याही परवानगीशिवाय वृक्षतोड केलेली असल्याचा आरोप करत सद्यस्थितीमध्ये दगड उत्खननासाठी पोखलेनच्या सहाय्याने मोठमोठी झाडे उपटून ती मातीमध्ये गाडण्याचे व लाकूड विकण्याचे काम सुरु केले असल्याबाबत लेखी तक्रार दिली.

तसेच सदर कंपनीचे मालक व तिन्ही क्रशर कंपनी यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१ – च, छ) अंतर्गत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी जिजाऊ संघटनेच्या खरीवली शाखेचे अध्यक्ष आझाद अधिकारी, उपाध्यक्ष युवराज भोईर व इतरांनी सह्या करून मुख्य वनरक्षक ठाणे, उपवनरक्षक जव्हार, वनरक्षक वाडा व वनक्षेत्रपाल कांचाड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. संबंधितांवर कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -