मुंबई-ठाण्यासह डोंबिवली, कल्याण, अंबरनाथमध्येही बत्ती गुल!

ठाणे : पडघा येथील महापारेषणच्या ४०० केव्ही उपकेंद्रात मंगळवारी सकाळी बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे महावितरणच्या पडघा ते पाल २२० केव्ही उच्चदाब वाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे मुंबईसह ठाणे शहर, डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. या बिघाडाचा फटका राज्यपालांच्या कार्यक्रमाला बसला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा पार पडत आहे. त्याच दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान वीज पुरवठा खंडित झालेल्या काही भागांमध्ये पाऊण तासात वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.


महावितरण आणि महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.


या बिघाडाचा परिणाम टाटा वीज कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यावर झाला. टाटाकडून मुंबई शहरातील काही भाग आणि उपनगरात वीज पुरवठा करण्यात येतो. या बिघाडामुळे दादर, माहीम, वांद्रे येथील वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान, टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मुंबई आणि उपनगरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीजेची मागणी सुरळीत ठेवण्यासाठी काही भागात भारनियमनही केले जाऊ शकते. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे टाटा पॉवरने म्हटले.


याबद्दल बोलताना महावितरणचे अधिकारी चंद्रकांत डांगे म्हणाले की, पडघा वीज उपकेंद्रावर बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. टप्प्याटप्प्याने आता वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. तासाभरामध्ये प्रत्येक ठिकाणी वीजपुरवठा सुरू होईल.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई