Wednesday, July 2, 2025

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले भाजपात

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले भाजपात

सिंधुदुर्ग (हिं.स.) : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी मुंबई येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राजघराण्यातील लखमराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणिते बदलण्याची शक्यता आहे.


सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा सध्या दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र लखमराजे भोसले यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने येत्या काळात या मतदारसंघात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लखमराजे भोसले यांच्या प्रवेशामुळे सावंतवाडी मध्ये देखील भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


त्यांच्या भाजप प्रवेश यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रसाद लाड, यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी लखमराजे भोसले यांचे स्वागत केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >