मुंबई : फटके पडल्याशिवाय सुधारणार नाहीत, अशा शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला.
भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना घडली. सोमय्या शनिवारी रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
सोमय्या परत जात असताना पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आले. सोमय्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले. दरम्यान या हल्ल्याचा भाजपने निषेध व्यक्त केला आहे.