Friday, December 13, 2024
Homeमहत्वाची बातमीमाजी राज्यपाल शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना दुःख

माजी राज्यपाल शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना दुःख

मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कटीकल शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

शंकरनारायणन हे प्रामाणिकपणा व सचोटीसाठी परिचित असे आदरणीय व लोकप्रीय नेते होते. केरळ विधानसभेचे ते दीर्घ काळ सदस्य राहिलेले शंकरनारायणन हे उत्तम प्रशासक होते. केरळचे वित्तमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

महाराष्ट्रातील आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च शिक्षण, मागास भागांचा विकास व आदिवासी विकास या विषयांमध्ये विशेषत्वाने लक्ष घातले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६ राज्यांच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळला होता.

आपल्या निःपक्ष वर्तनातून त्यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा वाढवली. दिवंगत शंकरनारायणन यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांची कन्या तसेच इतर आप्तेष्टांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -