विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यातील बहुतांशी भाग डोंगराळ आहे. या भागातील वाडे-पाड्यावर येणे प्रत्येक कुटुंबापर्यंत नोंदणीच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्यासाठी व शाळा अंगणवाड्यांना पाणी मिळवण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत योजना करण्यात आल्या आहे. काही शाळा अंगणवाड्यांना या योजना अजूनही करणे बाकी आहेत.
जलजीवन मिशन राबवण्यात येत असून ‘हर घर नल जल’नुसार प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जनजीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे राबवलेल्या विविध योजनांच्या अस्तित्वातील साधनांचा वापर करून व आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करून योजनेची सुधारात्मक पुन्हा जोडणी करणे आवश्यक या शाळा अंगणवाड्यांना व घराघरात नळ योजना ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगातून ग्रामपंचायती करून या योजना केल्या जात असून विक्रमगड तालुक्यातील २३५ जिल्हा परिषद शाळा व ३१५ अंगणवाड्यांना योजनालाभ मिळणार आहे.
या योजना लवकरात लवकर अंगणवाडी आणि शाळांना नळ योजना केल्या जाव्यात, जेणेकरून याचा फायदा होणार आहे.