'शिवसेना ट्रॅपमध्ये अडकली'

  91

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसैनिकांनी राज्यात आक्रमक निदर्शने सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट राणा दाम्पत्य राहत असलेल्या ठिकाणी धडक दिली. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे एक ट्वीट करत शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचे म्हटले आहे.


'शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे, एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहे,' असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.


https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1517716245814349824

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्री परिसरात करण्यात आलेला हल्ला आणि इतर काही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी तर थेट केंद्र सरकारकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या राड्याचा धागा पकडत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचा दावा केला आहे.


राज्यातील घटनांवरून शिवसेनेवर टीका करत असताना संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा मशिदीच्या भोंग्यांवर भाष्य केले आहे. 'तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवले काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नको आहे. आम्ही काय चुकीचे बोलत आहोत? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची