मुंबई (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त, मराठी भाषेची जोपासना व संवर्धन तसेच वर्तमानपत्रांचे मराठी भाषा लोकमानसात जिवंत ठेवण्याचे योगदान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत चार हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा गुरुवार दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता दामोदर हॉल, परेल येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बालनाट्य निर्माता, हुरहुन्नरी कलाकार मंदार गायधनी वृत्तपत्रांचे महत्त्व अधोरेखित करणारा एकपात्री प्रयोग सादर करतील. अधिक माहितीसाठी भालचंद्र पाटे ९८९२०३७५४३, प्रकाश गिलबिले ९८९२६८३०६१ यांच्याशी संपर्क साधा. पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी आपली ओळख म्हणून आधार कार्ड आणणे गरजेचे आहे. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांबरोबर फक्त दोन पालकांना सभागृहात येता येईल.