
मुंबई : : राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसैनिक यांच्यात सुरू असलेला गोंधळ पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1517730245524488192
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला. यानंतर गेले दोन तीन दिवस मुंबईत गोंधळ सुरू आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. "तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब???", असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
याचबरोबर, "शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे. एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत," असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.