पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह त्यांच्या भाचीचाही मृत्यू झाला.
सासवड वीर रस्त्यावर काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी रेणुकेश जाधव आणि त्यांची पत्नी सारिका जाधव हे दोघे त्यांची भाची ईश्वरी देशमुखला घेऊन सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर निघाले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास पिंपळे येथून जात असताना रस्त्याशेजारील अर्धवट जळालेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले.
यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला तर भाची ईश्वरी देशमुख बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ईश्वरीचा देखील मृत्यू झाला.