जम्मू : जम्मू- काश्मीरमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे 4 वाजेच्या सुमाराला सीआयएसएफच्या बसवर हल्ला केला. जम्मू येथील चड्ढा कॅम्पजवळ झालेल्या या हल्ल्यात एक जवान शहीद झालाय. दरम्यान सीआयएसएफने प्रत्युत्तर देताच जिहादी दहशतवाद्यांनी पळ काढला.
यासंदर्भात सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे 4.15 वाजता सीआयएसएफच्या 15 जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर जम्मूच्या चढ्ढा कॅम्प परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात एक जवान शहीद झाला असून दोघेजण जखमी झालेत. जवानांनी या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताच जिहादी दहशतवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान राज्यातील सुंजवान भागातही चकमक सुरू असून सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाल्याची माहिती एडीजीपी मुकेश सिंह यांनी दिली.