संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरणे मंजूर

  130

नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक २० एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नवनियुक्त समितीचे अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य यांचे प्रशासनाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य इत्यादी योजनांबाबत एकनाथ नाईक, नायब तहसीलदार, तथा आहरण व संवितरण अधिकारी, संजय गांधी योजना यांनी माहिती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य सचिव तथा तहसिलदार पनवेल, शासकिय सदस्य, संजय भोये, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल, यांच्या उपस्थितीत समितीची बैठक होऊन, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना इत्यादी लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजूरी देण्यात आलेली आहे.


संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरणे मंजूर करण्यात आली, तर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत एकूण ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. वरील प्रकरणात प्रति महिना रक्कम रुपये १ हजार ते १ हजार २०० मिळून एकूण रक्कम रुपये ५२ हजार ४००, तसेच केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना एकूण ४ प्रकरणे ८० हजार, असे एकूण १ लाख ३२ हजार ४०० इतके अनुदान लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता