मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या आकड्यात आता चढ उतार पाहायला मिळत आहे. बुधवारी मुंबईत ९८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर बरे झालेले रुग्ण ७३ आणि सक्रिय रुग्ण ४१५ इतके आहेत.
विशेष म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२९५३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ०४४ बेड्स असून त्यापैकी १० बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्के बेड रिक्त आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने राज्यात मास्कसक्ती ऐच्छीक करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली. त्यामुळे राज्यात सारेकाही सुरळीत सुरू झाले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धुमाकूळ घालणारी रुग्णसंख्या एकेरी आकड्यात आली.
त्यामुळे कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले. दरम्यान आता पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत चढउतार पहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरातील कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या जवळ पोहचली आहे. बुधवारी मुंबईत ९८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर बरे झालेले रुग्णांची संख्या ७३ आहे. आणि मुंबईत सक्रिय रुग्णसंख्या ४१५ इतकी आहेत.
कोरोनाची आकडेवारी
दरम्यान सध्या मुंबईत रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार पाहायला मिळत असून १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वरखाली होत आहे.