Sunday, June 22, 2025

बस १०० टक्के पर्यावरणपूरक करणार

बस १०० टक्के पर्यावरणपूरक करणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात बेस्टच्या "टॅप इन टॅप आऊट" कार्डचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बेस्टचा प्रवास इलेक्ट्रिकने सुरू झाला आणि आता पुन्हा आपण इलेक्ट्रिककडे आलो आहोत. डबलडेकर बस हव्यात हा माझा आणि मुख्यमंत्री यांचा सुरुवातीपासून आग्रह राहिला आहे. त्यामुळे १०० टक्के बस पर्यावरणपूरक करणार असल्याचा निर्धार ठाकरे यांनी यावेळी केला.


दरम्यान मुंबईत ९०० इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस ऑगस्टपर्यंत रस्त्यावर धावताना दिसतील. एकूण ३३३७ बस आपल्याकडे सध्या आहेत. १० हजार बसची गरज आहे, या बस १०० टक्के पर्यावरणपूरक असाव्यात, त्यातल्या सगळ्या इलेक्ट्रिक हव्यात, यातील निम्म्या डबल डेकर बस असतील. मुंबईकरांना 'इज ऑफ लाइफ'साठी आपण प्रयत्नशील आहोत.


जगभरातील सर्वात स्वस्त व मस्त आपली बेस्ट आहे तसेच पुढील आठवड्यात 'नॅशनल मोबिलिटी' कार्डचे आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करतोय, हे कार्ड सगळ्या ठिकाणी चालेल, अशी माहिती असे आदित्य ठाकरे यांनी दिली.

Comments
Add Comment