Saturday, May 17, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

पोलीस पदन्नोतीच्या आदेशाला अवघ्या १२ तासांत स्थगिती

पोलीस पदन्नोतीच्या आदेशाला अवघ्या १२ तासांत स्थगिती

मुंबई : राज्याच्या पोलीस पदोन्नतीचा आदेश जारी होऊन अवघे १२ तासही झालेले नसताना गृहखात्यातून काल रात्री जारी केलेले आदेश तातडीने स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे.


स्थगितीच्या आदेशामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण पोलीस बदली आणि पदोन्नतीचा आदेश जारी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पदोन्नतीच्या आदेशावर स्थगिती देण्याची वेळ गृहखात्यावर का आली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.


मुंबई आणि ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे. यात एकूण पाच पोलिसांची पदोन्नती थांबविण्यात आली आहे. राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.


या पाचही जणांना देण्यात आलेली पदोन्नतील पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तसे पत्रकच राज्याच्या गृहखात्याकडून जारी करण्यात आले आहे. पोलीस बदलीचा आदेश मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


या अधिकाऱ्यांचे प्रमोशन थांबवले...


१. राजेंद्र माने
विद्यमान पद- उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
पदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर


२. महेश पाटील
विद्यमान पद- पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार-पोलीस आयुक्तालय
पदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई


३. संजय जाधव
विद्यमान पद- पोलीस अधिक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे
पदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर


४. पंजाबराव उगले
विद्यमान पद- पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे
पदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस, मुंबई


५. दत्तात्रय शिंदे
विद्यमान पद- पोलीस अधिक्षक, पालघर
पदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई


गृहविभागाने जारी केलेले पत्रक


Comments
Add Comment