नवी दिल्ली (हिं.स) : खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा (KIUG) आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यात मदत करेल, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. कर्नाटकात होणाऱ्या खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेविषयी ते माध्यमांना माहिती देत होते.
ठाकूर यांनी सांगितले की KIUG 2021 ही दुसरी खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा आहे, ज्याचे आयोजन बंगळुरूमध्ये केले जाईल आणि जैन विद्यापीठ या खेळांचे यजमान विद्यापीठ असेल. केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासह कर्नाटक सरकारद्वारे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 24 एप्रिल ते 3 मे या कालावधीत होणार आहे. “KIUG 2021 मध्ये सुमारे 190 विद्यापीठांमधून 3879 हून अधिक स्पर्धक सहभागी होतील. ज्यांच्यात 20 स्पर्धा प्रकारांमध्ये आणि 257 सुवर्णपदकांसाठी चुरस असेल, ज्यात मल्लखांब आणि योगासनासारख्या देशी खेळांचा समावेश आहे”, असेही ठाकूर यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी असेही सांगितले की, या स्पर्धांमध्ये अनेक खेळ पहिल्यांदाच खेळले जातील. यंदा प्रथमच खेलो इंडिया हरित खेळांचा समावेश आहे. खेळांमध्ये पुनर्वापर करता येण्याजोगे साहित्य यात असेल आणि ते कचरा निर्मिती विरहित असतील याची खात्री केली जात आहे. याशिवाय, स्पर्धेसाठी प्रथमच मोबाइल ऍप्लिकेशन देखील विकसित केले गेले आहे ज्यामध्ये खेळांबद्दल आवश्यक असलेली सर्व माहिती असेल जी खेळापूर्वी आणि खेळादरम्यान खेळाडू वापरू शकेल, अशा प्रकारे सहभागींना डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनातून सुविधा मिळेल.
श्रीहरी नटराज आणि दुती चंद यांच्यासह अनेक ऑलिम्पिकपटू खेळांमध्ये सहभागी होतील, तसेच ऑलिम्पिक 2028 साठी प्रशिक्षण घेणारे अनेक खेळाडू सहभागी होतील.सोनी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी एलआयव्ही सोबत डीडी आणि सोनी 6 सह सोनी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी LIV तसेच आकाशवाणी, प्रसार भारती, खेलो इंडिया आणि इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पर्धांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. सहभागी खेळाडूंना माहिती, शिक्षण आणि संप्रेषण प्रसारित करण्यासाठी उत्तेजक द्रव्य विरोधी राष्ट्रीय संस्था NADA प्रथमच अॅप वापरणार आहे जेणेकरून त्यांना उत्तेजक द्रव्याच्या धोक्याबद्दल पुरेपूर शिक्षित केले जाईल.