नवी दिल्ली : देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 24 तासात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 67 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला होती. आज या रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे.
देशात आत्तापर्यंत 4 कोटी 30 लाख 49 हजार 974 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 22 हजार 062 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तस सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 433 आहे. गेल्या 24 तासांत 1,093 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.76 टक्के आहे.