मुंबई : प्रसिद्ध चित्रकार श्रुती गोएंका यांनी साकारलेल्या “आत्मबोध – एक प्रवास” ह्या आध्यात्मिक चित्रकृतीचे प्रदर्शन २५ एप्रिलपर्यंत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू आहे. चित्रकार श्रुतो गोएंका यांनी “आत्मबोध – एक प्रवास” या चित्र मालिकेत त्यांचा स्वत:चा आत्मशोधाकडे एकत्रित झालेला दृष्टीकोन प्रतिबिंबीत केला आहे.
लडाखमधील मठ, वाराणसी येथील गंगेचे घाट आणि दक्षिण भारतातील मंदिरे, मुंबईतील कान्हेरी गुंफा आणि इतर मोहक मोहिमा यातून प्रेरित होऊन श्रुती गोएंका यांनी विश्वाच्या निर्मितीबद्दल बोलणाऱ्या कलाकृतीची निर्मिती केली आहे. विश्वाची निर्मिती, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचे चक्र, मानव निर्मितीचे पाच घटक, आत्म प्राप्तीचा मार्ग, मुक्ती यांचा आत्मबोध त्यांनी आपल्या चित्रातून सुंदररीत्या सादर केला आहे.
आपल्या अनोख्या व कलात्मक शैलीत आध्यात्मिक प्रवासाचे विविध पैलू त्यांनी आपल्या चित्रात साकारले आहे.