मुंबई : खार पश्चिम येथील नोटन विल्हा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज सकाळी १०:३० च्या सुमारास भीषण आग लागली.
आग लागल्याचे समजतात अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-याने सांगितले.
ही इमारत सात मजली असून लागलेली आग दुस-या लेवलची आहे असे अग्निशमन अधिका-याने सांगितले आहे.
घटनास्थळी रुग्णवाहीका दाखल असून काही तासातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, या इमारतीत आग लागण्याची सहा महिन्यातील ही दुसरी घटना आहे.