Friday, May 9, 2025

महामुंबई

मुंबई - मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई - मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई (प्रतिनिधी): प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.


०१०४७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २२ एप्रिल २०२२, २४ एप्रिल २०२२ आणि २६ एप्रिल २०२२ रोजी (३ फेऱ्या) सकाळी ०७.५० वाजता ही गाडी सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल. ०१०४८ मडगाव येथून दि. २२ एप्रिल २०२२, २४ एप्रिल २०२२ आणि २६ एप्रिल २०२२ रोजी (३ फेऱ्या) रात्री ७.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.


या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमाळी असे थांबे असतील. दोन तृतीय वातानुकूलित, २ वातानुकूलित चेअर कार, २ शयनयान, ४ आरक्षित द्वितीय श्रेणी आसन, गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि जनरेटर व्हॅन अशी या गाड्यांची संरचना असेल.


विशेष ट्रेन क्र. ०१०४७/०१०४८ साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २१ एप्रिल २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान या ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment