उरणमधील गुटखा विक्रेत्यांना अभय कोणाचे?

उरण (वार्ताहर) : सध्या देशासह महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. मात्र उरण तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढेच नाही, तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून तालुक्यातील खेड्यापाड्यांत गुटखा पुरविण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्रीवर बंदी आणली. मात्र ही बंदी कागदावरच असल्याचे दिसून आले आणि असाच गुटखा व्यवसाय तालुक्यात जोरात सुरू आहे.


पोलीस आणि अन्नप्रशासन विभागाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत असताना मात्र उरणमध्ये कारवाई होताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


तालुक्यात होलसेल गुटखा विकला जात आहे. विशेष म्हणजे, भरदिवसा दुचाकीवर बॉक्स टाकून बिनधास्त लागेल त्याला माल पुरवला जातो. संबधित खात्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी विक्रेत्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होण्याची चिंता नाही. त्यामुळे गुटखा विक्रेता दिवस-रात्र गुटखा विक्री करत आहे, असा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.


रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गुटखा विक्रेत्यांना पकडण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र उरणमध्ये दररोज लाखो रुपयांच्या गुटख्याची विक्री होत असताना त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांना अभय दिले जात आहे. उरणमध्ये अनेकजण खुलेआम गुटखा विक्री करत आहेत. विक्रेते ज्यावेळी वर्दळ कमी असते त्यावेळी बाहेरून गुटखा मागवून गाडी इतर ठिकाणी उभी करून माल खाली करत असतात. तसेच आम्ही आर्थिक हितसंबंध जपत असल्याने आमच्यावर कारवाई होण्याची शक्यता नसल्याची दर्पोक्ती गुटखा विक्रेते करत आहेत.

Comments
Add Comment

अलिबाग नगरपालिकेचा १६१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य : नगराध्यक्षा अक्षया नाईक अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया तालुकास्तरावर ११ मार्चला सभापती,

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी