उल्हासनगर : दोन आठवड्यांपूर्वी रस्त्यावरून जात असताना एका नर्सला मारहाण करून तिचा मोबाइल खेचून नेल्याची घटना घडली होती. नर्स कार्यरत असलेल्या रुग्णालयातील एका डॉक्टरने हा मोबाइल चोरण्यासाठी सुपारी दिली असल्याची बाब तपासात समोर आल्याने मध्यवर्ती पोलिसांनी डॉक्टरसह तीन जणांना अटक केली आहे.
नर्सच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह फोटो असल्याचा संशय असल्याने डॉक्टरनेच षडयंत्र रचल्याची बाब समोर आली आहे. उल्हासनगर कॅम्प १ मधील सी ब्लॉक चौकात असलेल्या एका रुग्णालयात तीन वर्षांपासून एक नर्स काम करते. तिला ४ एप्रिलला रुग्णालयातून सुट्टी दिली होती.
१० एप्रिलला या नर्सला रुग्णालयातून फोन करून डॉ. शहाबुद्दीन यांनी कामावर बोलाविले. सायंकाळी सहाच्या सुमारास त्या हॉस्पिटलकडे जात असताना त्यांचा मोबाइल एका अनोळखी व्यक्तीने जबरीने खेचून नेला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वीही या नर्सचा मोबाइल चोरीचा प्रकार घडला होता, त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, पोलीस हवालदार राजाराम कुकले, पोलीस नाईक विलास जरग यांनी तपास सुरू केला.