मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची घटलेली संख्या पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेत राज्यांना कोरोना नियंत्रणाबाबत पत्र लिहिले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात येणार का, अशी चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असून मास्कसक्तीबाबत विचार नाही, पण ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने मास्क वापरावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.