मुंबई : ‘प्रोजेक्ट ७५’ च्या अंतर्गत स्कॉर्पिन वर्गाची ही सहावी श्रेणीची पाणबुडी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलासाठी बांधलेली आयएनएस वागशीर आज मुंबईत जलावतरण करण्यात येणार आहे. आयएनएस वागशीर आता नौदलात दाखल होण्यापूर्वी बंदर आणि समुद्रात कठोर चाचण्या घेतील. या पाणबुड्या नेव्हल ग्रुप, फ्रान्सच्या सहकार्याने बांधल्या जात आहेत.
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार आहे. ‘आयएनएस वागशीर’ ही स्कॉर्पिन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. आज वागशीर पाणबुडीचे जलावतरण झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी चाचणी आणि परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पाणबुडी युद्धासाठी पूर्णपणे तयार होणार आहे. ही पाणबुडी पूर्णपणे तयार झाल्यानंतर तिचा समावेश भारतीय नौदलात करण्यात येणार आहे.
माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडने तयार केलेल्या वागशीर पाणबुडीत अत्याधुनिक तंत्रज्ञानसह स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ही पाणबुडी स्कॉर्पीन कलावरी वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहे.
आतापर्यंत माझगाव डॉक लिमिटेडने तयार केलेल्या स्कॉर्पिन वर्गाच्या कलवरी, खंडेरी, करंज, वेला या पाणबुड्यांचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला आहे. आयएनएस वागशीर पाणबुडी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. कमी आवाजात शत्रूची सहज दिशाभूल करण्याची क्षमता असलेल्या आयएनएस वागशीरमध्ये १८ टॉर्पेडो वाहून नेण्याची क्षमता आहे. या पाणबुडीतून एकाच वेळी सहा टॉर्पेडो डागता येतात. शिवाय जहाजविरोधी क्षेपणास्त्रे नष्ट करण्याची या पाणबुडीची खासियत आहे. ही पाणबुडी ५० दिवस पाण्यात राहू शकते. आयएनएस वागशीर या पाणबुडीचे अंतर्गत तंत्रज्ञान फ्रेंच आणि एका स्पॅनिश कंपनीने तयार केले आहे.
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…