Sunday, July 21, 2024
Homeकोकणरत्नागिरीचिपळूणचा समीर मोरे ‘राजापूर श्री २०२२’

चिपळूणचा समीर मोरे ‘राजापूर श्री २०२२’

राजापूर (वार्ताहर) : येथील शिवबा प्रतिष्ठान राजापूरतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘राजापूर श्री २०२२’ जिल्हास्तर शरीरसौष्ठव स्पर्धेत शानदार सादरीकरण करत एनएसजी फिटनेस चिपळूण व्यायामशाळेच्या समीर मोरे याने जेतेपदाचा किताब पटकावला. तालुकास्तरावरील ‘राजापूर श्री २०२२’चा बहुमान आरएसपीएम राजापूर व्यायामशाळेच्या अजिंक्य कदमने पटकावला.

राजापूरशहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेली जिल्हास्तरीय ‘राजापूर श्री २०२२’ ही स्पर्धा चार गटांत खेळविण्यात आली. या चार गटांतून प्रत्येकी पाचजणांची निवड करण्यात आली. अंतिम स्पर्धेसाठी निवड झालेल्या वीस स्पर्धकांनी शानदान प्रदर्शन केले. यामध्ये चिपळूण व्यायामशाळेच्या समीर मोरे याने बाजी मारली. स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ म्हणून फेक्स हार्डकोअर रत्नागिरी व्यायामशाळेच्या प्रणव कांबळी याची, तर ‘उगवता तारा’ म्हणून आरएसपीएम राजापूर व्यायामशाळेच्या हर्षद मांडवकर याची निवड करण्यात आली. तालुकास्तरावर झालेल्या स्पर्धेत तीन गटात १४ स्पर्धक सहभागी झाले. त्यातून अजिंक्य कदम सरस ठरला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगरसेवक सौरभ खडपे, प्रांताधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार दिपाली पंडीत, सुशांत मराठे, रूपेश कांबळे, आफताब शेख, मनसेचे प्रकाश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवबा प्रतिष्ठानच्या संदेश आंबेकर, राजा खानविलकर, भुषण आरेकर, संदेश गुरव, सुरज पेडणेकर, दीपक चव्हाण, मंदार पेणकर, सुशांत पवार, मंदार बावधनकर, साईराम अमरे, डॉ. सुयोग परांजपे, हर्षद मांडवकर, राजीव राणे, सत्यवान लोळगे, सुनील पवार, संदीप चव्हाण, अविनाश तांबट, कृष्णा करंबेळकर, अक्षय पोकळे, प्रज्योत खडपे, नीलेश खानविलकर, स्वप्नील बाकाळकर यांसह शिवबा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -