मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बैलगाडा मालकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भातील अधिसूचना मंगळवारी जारी केली आहे. बैलगाडा शर्यतीसंबंधी विविध गुन्हे मागे घ्यावेत ही मागणी अनेक दिवसांपासून होत होती. शासनाने अधिसूचना जारी केल्याने बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे.
नुकतीच सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. अटी-शर्तींवर बैलगाडा शर्यती सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बैलगाडा शर्यती सुरु झाल्या आहेत. दरम्यान, बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. महाविकास आघाडी सरकारने ही बाब विचारात घेत, गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अधिसूचना जारी करण्यात आली आहे.