Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीकाजू आणि मोहाच्या फुलापासून बनणारी दारू आता 'देशी' नव्हे तर 'विदेशी'

काजू आणि मोहाच्या फुलापासून बनणारी दारू आता ‘देशी’ नव्हे तर ‘विदेशी’

महसूल वाढीसाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : काजू आणि मोहाची फुलं यांच्या पासून बनणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय मत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याआधी या दारूला देशी दारूचा दर्जा देण्यात आला होता. मात्र जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानात मिळणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल असा राज्य सरकारचा मानस मानस आहे.

मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. इलाईट आणि सुपर प्रिमियम असे दोन गट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जी छोटी दुकान आहेत ते आपला दुकानाचा विस्तार करून मद्य विक्रीची कक्षा वाढवू शकतात. ६०० चौरस फुटांपर्यंत वाढवू शकतात तर सुपर प्रिमियम ६०० चौरस फुटांच्या वरती वाढवता येणार आहे. महसूल वाढवण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये आहे.

महसूल वाढीसाठी  एफएल-२  परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.  काजूबोंडे, मोहाच्या फुलांपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण आखले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -