Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होण्यास दबाव आहे का?

देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होण्यास दबाव आहे का?

मुंबई (प्रतिनिधी) : रझा अकदामीच्या इफ्तार पार्टील रविवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हजेरी लावली होती. यावरून आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ज्या ‘रझा अकादमीने’ आझाद मैदानात अमर जवान स्तंभ तोडला व महिला पोलीस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन, त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहीत करणे हे महाविकास आघाडीचे धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवर दबाव आहे का?” असा सवाल त्यांनी केला आहे.


आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवर व्हिडिओद्वारे म्हटले आहे की, “काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. ही रझा अकादमी नेमकी काय आहे? तर, जिने आझाद मैदानावरील अमर जवान स्तंभाची मोडतोड केली आणि त्यानंतर महिला पोलिसांना मारहाण आणि अत्याचार केले. ही रझा अकादमी म्हणजे तीच जिने सतत देशविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत.”

Comments
Add Comment