मुंबई (प्रतिनिधी) : पाच वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका नराधम पित्याला मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका नराधम पित्याला मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीने कोर्टात सादर केलेला युक्तिवाद हा धक्कादायक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
एका चाळीस वर्षीय पित्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार पोक्सोअंतर्गत नोंदविण्यात आला होता. या खटल्याची सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुलीचा पिता हा अत्यंत जवळचा विश्वास पात्र व्यक्ती आणि तिचा संरक्षक असतो. मात्र, असे असतानाही पित्यानेच आपल्या मुलीचे लैंगिक शोषण करणे हे धक्कादायक असल्याचे निरीक्षण न्यायाधीश एच. सी. शिंदे यांनी नोंदवले आहे.
आरोपीने केला धक्कादायक युक्तिवाद – या खटल्यातील आरोपीने अत्यंत धक्कादायक युक्तिवाद न्यायालयासमोर केला. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या मुलीच्या गुप्तांगाला बोटाने स्पर्श केल्याची तक्रार मुलीने केलेली नाही. त्याच्या युक्तिवादाने न्यायाधीशही चक्रावून गेले.