Monday, December 2, 2024
Homeमहामुंबईनंदेश उमप यांना भारतरत्न डॉ. आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान

नंदेश उमप यांना भारतरत्न डॉ. आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान

भाजपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांचे वितरण

मुंबई (प्रतिनिधी) : खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि प्रशासकीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रज्ञावंतांचा सत्कार मुलुंड येथील गोपुरम हॉल येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नियोजन भाजप ईशान्य मुंबई जिल्हा सचिव डॉ. श्वेता शेजवळ यांनी केले. यावेळी खा. कोटक यांच्या हस्ते गायक नंदेश उमप यांचा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये नंदेश उमप (लोककला आणि गायन), रवी मोहीते (संगीत संयोजन), गजेश कांबळे (अभिनय), स्पृहा सुरेश इंदू (शिक्षण), मानसी अहिरे (शिक्षण), विनोद जाधव (सामाजिक व राजकिय कार्यकर्ते), प्रदीप गांगुर्डे (निवृत्त सरकारी अधिकारी), नितीन सोनावणे (फोटोग्राफी), स्मिता सरोदे – देशपांडे (अभिनय) यांचा समावेश आहे.

खासदार मनोज कोटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेजर डॉ. अश्लेशा तावडे-केळकर आणि भाजप जिल्हा अध्यक्ष अशोक राय हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. मिलिंद शेजवळ यांचे ‘पंचतिर्थ’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रस्थानी ठेवून आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत अशा पाच महत्त्वाच्या स्थळांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘पंचतिर्थ’ म्हणून घोषित केले. बाबासाहेबांचे महू येथील जन्मस्थळ, नागपूर येथील दिक्षा भूमी, दादर येथील चैत्यभूमी, दिल्ली येथील २६ अलीपूर रोड येथील महानिर्वाण भूमी आणि लंडन येथील शिक्षा भूमी अशा पाच स्थळांची माहिती डॉ. शेजवळ यांनी दिली.

गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात या पंचतिर्थांचे हस्तांतरण, सुशोभीकरण, निधीची व्यवस्था या सर्व आघाड्यांवर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा त्यांनी आढावा घेतला.

सर्व सत्कारमूर्तींचा सत्कार खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आला. नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात डॉ. बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मेजर डॉ. अश्लेशा यांनी डॉ. बाबासाहेबांच्या त्यांच्या जीवनावर प्रभाव आणि इंडियन आर्मीमधील थरारक अनुभव सांगितले.

या कार्यक्रमास नगरसेविका समिता कांबळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनोद कांबळे, मुंबई भाजप उपाध्यक्ष डॉ. शिरीष जाधव, भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश भाजप सचिव रश्मी जाधव, मुलुंड मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष दीपिका घाग, बिना सिंग, सुनिता शेशावरे, अश्विनी सिनरी, तेजल बथाई, कपिला कोठारी, सुप्रिया नायर, राजाभाऊ तायडे, अजीतभाऊ रणदिवे, प्रकाभर कांबळे, डॉ. आम्रपाली रणदिवे, डॉ. पूनम शेजवळ, जुई शेजवळ, अशोक शर्मा, जतीन चंदे, पप्पू जोशी, लुईस सर, दिलीप वडजे, शिवकुमार, आशाताई चव्हाण, छाया वेताळ, अतुल उबाळे, कलावती रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा देसाई या शालेय विद्यार्थिनीने केले.

यावेळी खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते गायक नंदेश उमप यांचा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती व प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी आपल्या खणखणीत व पहाडी आवाजात बाबासाहेबांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -