अचलपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्या वरील विधाना नंतर राज्यात भोंगा वरून वाद पेटला आहे,यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठं विधान करत राजकीय नेत्यांचे निवडणूकीत भोंगेही बंद करा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
यासंदर्भात कडू म्हणाले की, गेली दोन वर्षे कोरोना मुळे सर्व मंदिर,बौद्ध विहार,मशिदी मधील भोंगे बंद होते. त्यावेळी फक्त रुग्णवाहिका वरून भोंगा सुरू होता. देश सध्या कश्या परिस्थितीत आहे. मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहेत. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे. निवडणूकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.