
काबुल : पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार भागात पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात ४७ जणांचा मृत्यू झाला. तर २२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
अनेक दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरकारवाया सुरू आहेत.अनेक दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानच्या सैनिकांवर हल्ले केले. यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही हल्ले केले असल्याचे पाकिस्तान कडून सांगण्यात आले आहे.