मुरबाड (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरओ प्लांटचे (पाणी शुद्धीकरण) मुरबाड तालुक्यातील माल्हेड गावात राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यातून दहा रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे.
एटीएमद्वारे पाणी पुरवठा करणारे हे जिल्ह्यातील पहिले माल्हेड गाव सेंटर ठरले गेले आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्याचे चटके लागत असतानाच योग्य वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी एटीएमद्वारे पाणी पुरवठा सुरू केल्याने मुरबाड तालुक्यातील संपूर्ण ठाणे जिल्ह्यात या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
एटीएमद्वारे पाणी पुरवठाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार गोटीराम पवार, निर्मलाताई पवार, आ. बाळाराम पाटील, शुभांगी पवार, माजी आमदार दिगंबर विशे, पांडुरंग बरोरा, आदी उपस्थित होते.