Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्य‘‘नो फ्रेश ट्रेड वेट अँड वॉच’’

‘‘नो फ्रेश ट्रेड वेट अँड वॉच’’

डॉ. सर्वेश सुहास सोमण

मागील आठवडा हा सुट्ट्यांमुळे अतिशय कमी कामकाजाचा होता. सोमवारची सुरुवात ही नकारात्मक झाली, ज्यामध्ये निफ्टीने १७८०० हा साप्ताहिक उच्चांक नोंदवत त्यानंतर घसरण दर्शवली. मंगळवार आणि बुधवारच्या सत्रात निर्देशांकामधील ही मंदी वाढत गेली आणि निफ्टी साप्ताहिक नीच्चांकी पातळीला ह्या आठवड्यात बंद झाली. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची १७२३५ ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जर ही पातळी तुटली, तर निफ्टीमध्ये आणखी अंकांची घसरण होऊ शकते. सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा मंदीची असून तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसीस) मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार म्हणजेच शॉर्ट करता येईल. चार्टनुसार इमामी लिमिटेड, एचडीएफसी बँक, गोदरेज कन्झुमर, फोर्टिस या शेअर्सची दिशा अल्पमुदतीसाठी मंदीची झालेली आहे. आपण आपल्या मागील २१ मार्च २०२२ रोजीच्या लेखामध्ये “जेके पेपर” ह्या शेअर ने २८५ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून ३००.९० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात वाढ होणे अपेक्षित आहे” असे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर ह्या आठवड्यात देखील ह्या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून आली. या आठवड्यात या शेअरने ३४८ रुपये हा उच्चांक नोंदवला, आपण सांगितल्यानंतर यामध्ये तब्बल ४८ रुपयांची वाढ दिसून आली आहे आणि टक्केवारीत पाहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर केवळ एक महिन्याच्या आत या शेअरमध्ये १५ टक्क्यांची वाढ झालेली आहे.

आपण आपल्या मागील २८ मार्च रोजीच्या लेखामध्ये “कमिन्स इंडिया लिमिटेड ह्या शेअरने १०६४ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आज १०८६ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात वाढ होणे अपेक्षित आहे” असे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर ह्या आठवड्यात शेअरने ११६२ रुपये हा उच्चांक नोंदवला, म्हणजेच तब्बल ७६ रुपयांची वाढ दिसून आली आणि टक्केवारीत पहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर केवळ एक महिन्याच्या आत ह्या शेअर ने ७ टक्के इतका घसघशीत परतावा दिला. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५७०० आणि निफ्टीची १७२०० ही अत्यंत महत्वाची पातळी आहे. जर या पातळ्या तुटल्या तर निर्देशांकात आणखी मोठी घसरण होऊ शकते. मागील आठवड्याच्या लेखात सांगितल्याप्रमाणे अनेक शुगर कंपन्यांचे शेअर्स हे तेजीचे संकेत देत आहेत. ज्यामध्ये बलरामपुर चीनी, राणा शुगर, उगार शेअर, धामपूर शुगर हे शेअर्स तेजीमध्ये आहेत. त्यामुळे निर्देशांकातील पुढील घसरणीत अल्पमुदतीसाठी शुगर सेक्टरकडे पाहता येईल.

आपण मागील लेखातच कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७७०० या पातळीच्यावर आहे तोपर्यंत कच्चे तेलात आणखी वाढ होऊ शकते. अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५२००या पातळीच्यावर आहे. तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -